Thane: ACB ची पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई; फौजदारी खटल्यासंदर्भातील प्रकरणात 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले
Arrested | (File Image)

Thane: महाराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील एका 45 वर्षीय पोलीस अधिकाऱ्याला फौजदारी खटल्याचा सामना करणाऱ्या व्यक्तीकडून 30 हजारांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली. प्राप्त माहितीनुसार, हवालदार असलेले संतोष अर्जुन मोरे यांनी सुरुवातीला तक्रारदाराकडून 40,000 रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराकडून 30 हजार रुपयांची लाच घेताना संतोष मोरे यांनी अटक करण्यात आली.

मोरे यांनी दावा केला की, ते नंतरच्या फौजदारी खटल्यात तक्रारदाराला मदत करू शकतील. ठाणे ग्रामीण पोलिसांशी संलग्न असलेल्या मोरे यांनी वाटाघाटीनंतर लाचेची रक्कम 30 हजारांवर आणली. तक्रारदाराने सावध केल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मोरे याला लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस ठाण्यात अटक केली, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (हेही वाचा - Nagpur: Devendra Fadnavis यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर Police आणि BJP च्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; पोलीस आयुक्तांनी केलं वृत्ताचं खंडन)

मोरे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात आणखी एका घटनेत, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवी मुंबई पोलिसांच्या दोन वाहतूक हवालदारांना ऑटोरिक्षा चालकाकडून 5,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली होती.

पोलीस उपअधीक्षक (नवी मुंबई एसीबी) शिवराज मेहेत्रे यांनी पीटीआयला सांगितले की, महापे वाहतूक विभागात संलग्न असलेले वाहतूक हवालदार प्रवीण राठोड (33) आणि नामदेव गाढेकर (35) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कॉन्स्टेबलने एका ऑटोरिक्षा चालकाला रहदारीचे उल्लंघन केल्याबद्दल पकडले होते. त्याचे वाहन जप्त केले होते आणि ते सोडण्यासाठी 5,000 रुपयांची मागणी केली होती. वाटाघाटीनंतर दोघांनी 2,000 रुपयांवर समझोता केला. सोमवारी लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीने त्यांना पकडले.