Nagpur: नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Nagpur's Commissioner of Police, Amitesh Kumar) यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर पोलीस (Police) आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. कोणताही फौजदारी गुन्हा घडला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. कुमार यांनी स्पष्ट केले की, देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी फौजदारी गुन्हा किंवा अदखलपात्र गुन्हा म्हणून वर्गीकृत अशी कोणतीही घटना घडली नाही. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी प्रवेश करण्यासाठी भाजप कार्यकर्ते जमल्याने वाद झाला. परंतु, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्वरीत हस्तक्षेप करून परिस्थिती प्रभावीपणे सोडवली. पोलिस आयुक्तांनी ही घटना तितकी गंभीर नसल्याचही म्हटलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कुमार यांनी सांगितलं की, देवगिरी (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकृत निवासस्थान) येथील घटनेला अतिशयोक्ती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की, अशी कोणतीही जास्त संवेदनशील घटना घडलेली नाही. देवगिरी येथे एक NC (अदखलपात्र गुन्हा) घडला. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी रांगा लावल्याने काही वाद झाला. मात्र, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. (हेही वाचा - Mumbai Suicide: मराठा आरक्षणासाठी मुंबईत जालन्याच्या तरूणाची आत्महत्या- विनोद पाटील यांचा दावा)
देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर भाजपचे सदस्य आणि पोलिस कर्मचारी यांच्यात हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी उपमुख्यमंत्री नागपुरात उपस्थित होते आणि भाजप सदस्यांचा एक गट त्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेटण्यासाठी पोहोचला. भाजप सदस्यांनी बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने हाणामारी झाली.
पोलिसांनी सुव्यवस्था राखण्यासाठी हस्तक्षेप केला, असे अहवालात म्हटले आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. परंतु, पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी उपमुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.