7 months old baby Kidnap: रेल्वे स्थानकावरून 7 महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण, घटना CCTV कैद
Kidnap Case PUNE PC twitter

 7 months old baby Kidnap: पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात आणखी एक घटना घडली आहे. रेल्वे स्थानक परिसरातून ७ महिन्याच्या बाळाचे अपहरण झाले आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रेल्वे स्थानकावरून एकाने बाळाचे अपहरण केल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा कामाला लागली.  पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे. (हेही वाचा- सामुहिक बलात्कार करून अल्पवयीन मुलीची हत्या; चौघांना पोलिसांकडून अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण अजय तेलंग असं अपहरण झालेल्या बाळाचे नाव आहे. बाळाचे अपहरण झाल्याची माहिती अजय यांनी पोलिस ठाण्यात दिली. बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला आहे. अजय यांनी पोलिसांना माहिती दिली की. बाळ आणि पत्नीसोबत भुसावळ येथून आले होते.पुण्यात नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. मध्यरात्री त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात विश्रांती घेतली होती.

दोघे ही निवांत झोपले होते. बाळ आईच्या कुशीत झोपले होते. त्यानंतर कुणीतरी आले आणि बाळाला गपचूप घेऊन गेले. दोघांना जाग आली त्यावेळीस बाळ कुशीत नव्हतं. दोघे ही घाबरून गेले आणि आजूबाजूला बाळाची विचारपूस केली.  परंतु कुठेही बाळ सापडले नाही. घाबरून दोघांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार नोंदवल्यानंतर रेल्वे स्थानकावरून तपास सुरु केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर एक जण बाळाला घेऊन जाताना दिसले. आरोपी बाळाला घेऊन फरार आहे. पोलिस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहे. लवकरच बाळाला ताब्यात घेऊ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.