संजय निरुपम (Photo Credits-Twitter)

मुंबईतील (Mumbai) आरे कॉलीनीतील (Aarey Colony) हजारोच्या संख्येने झाडे मेट्रोसाठी कापली जात आहेत. तर हायकोर्टाने वृक्ष तोडीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी उशिरा वाजल्यापासून आरे परिसरातील झाडांची कत्तल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकारावर विरोधी पक्षांसह पर्यावरण प्रेमींनी आरे परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत या प्रकाराचा विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. तर आता पर्यंत 29 जणांचा मुंबई पोलिसांनी अटक केली असून 9 ऑक्टोंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी या प्रकरणी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.

संजय निरुपम यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, मुंबई महापालिकेला एमएमआरसीएल यांनी आरे परिसरातील वृक्ष तोडीस परवानगी दिली. मात्र मी सगळ्यांना सांगू इच्छितो की, मुंबई महानगर पालिका ही शिवसेनेच्या हातात आहे. त्यामुळे शिवसेनेने यावर काही निर्णय घेऊ शकतो. मात्र तसे होत नसून भाजपच्या समोर शिवसेनेने हात टेकले असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.(Aarey Protest: आरे वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्या 29 जणांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात; कलम 144 लागू)

संजय निरुपम ट्वीट:

तर दुसऱ्या बाजूला वृक्षतोडीच्या निर्णयावर आंदोलन करण्यासाठी काही वेळापूर्वी शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मेट्रो उभारणीसाठी झाडांची कत्तल करण्यात येत असल्याने बॉलिवूड कलाकारांनी सुद्धा खंत व्यक्त केली आहे. दरम्यान आरे वृक्षतोड हा सद्य घडीचा ज्वलंत विषय ठरत आहे. आंदोलनांमुळे ही परिस्थिती चिघळत चालली आहे, परिणामी या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आरे कॉलनी परिसरात वाहनांनादेखील रोखण्यात आले आहे.