आकाशकंदील (फोटो सौजन्य- फेसबुक)
दिवाळी म्हणजे आनंद आणि दिव्यांचा लख्ख प्रकाश. पारंपारिक पद्धतीने चालत आलेली ही दिवाळी सध्या वेगळ्या ढंगात साजरी करताना दिसून येते. त्यामुळे गोवा पर्यटकांसाठी खास दिवाळीनिमित्त 40 फूट उंचीची आकाशकंदील बनवला आहे.
पणजीमध्ये मळा येखे यूथ ऑफ  यूथ ऑफ पोर्ताइज मंडळाने तब्बल 40 फूटी आकाश कंदील बनवला  आहे.तसेच काही गेले 15 दिवस मंडळाचे कार्यकर्ते त्यासाठी राबत होते. मंडळातर्फे दरवर्षी भला मोठा आकाश कंदील बनवून दिवाळी साजरी केली जाते. त्याला मिळणारा प्रतिसाद वर्षानुवर्ष वाढतच आहे. यंदा तर मंडळाने 1 लाख खर्च करून 40 फूटी आकाश कंदील बनवला आहे.
गोव्यात दिवाळीला भले मोठे नरकासूर बनववून त्याचे दहन करण्याची परंपरा आहे. परंतु गोवेकर मंडळाने ही    मात्र वेगळी वाट पकडत 40 फूटी आकाश कंदील साकारला आहे.