शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याशी खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले. गुरुवारी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये झालेल्या मुलाखतीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी मंत्र्यांचा परदेशी दौऱ्यांवर झालेला खर्च, उद्योगधंदे आणि भ्रष्टाचार यावरून शिंदे सरकारवर निशाणा साधला. महत्वाचे म्हणजे दिवसाच्या पहिल्या सत्रात ज्यांची मुलाखत घ्यायची होती, ते मुख्यमंत्री शिंदे दिल्लीतील तातडीच्या बैठकीचे कारण कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.
पक्षाच्या दोन गटांमध्ये समेट घडवून आणण्याची संधी आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ते सर्व 40 लोक जे पळून गेले होते त्यांनी भीतीपोटी असे केले. ते काहीतरी लपवण्यासाठी पळून गेले. जे धीट होते, प्रामाणिक होते ते पक्षासोबत राहिले.’ ठाकरे पुढे म्हणाले, ‘आताही ते (एकनाथ शिंदे) येथे येईपर्यंत मी वाट पाहण्यास तयार आहे. या ठिकाणी थेट चर्चा होऊ द्या. मी एकटा बसतो त्यांना त्यांच्या 40 जणांच्या गटासोबत बसू दे आणि ते पळून का गेले? खोटे का बोलले? बेरोजगारी, परदेश परदेश दौरे भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर समोरासमोर चर्चा करूया.’
But the illegal cm went to Delhi once again… https://t.co/AwZV7yHmKL
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 5, 2023
यावेळी ते आपला पक्ष संख्येच्या बाबतीत कमकुवत असला तरी तत्त्वांच्या बाबतीत तो खूप मजबूत आहे, असेही ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 'बेकायदेशीर' सरकारच्या खराब कामगिरीसाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरले. राज ठाकरेंसह ज्यांनी पक्ष सोडला त्या सर्वांसाठी पक्षाचे दरवाजे बंद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (हेही वाचा: Wardha Accident: वर्ध्यात ट्रॅव्हल्स पलटली; भीषण अपघातात १ जण दगावला, ८ प्रवासी जखमी)
त्यानंतर जाहीरपणे आदित्य ठाकरेंना उद्देशून पेंग्विन हा शब्द उच्चारला जातो. आदित्य ठाकरे यांनी 'इंडिया टूडे'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पेंग्विनवरुन होणाऱ्या टीकेला उत्तर दिले. विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी तर पेंग्विनसारखं चालत नाही. परंतु सरकारमधले कुणीतरी पेंग्विनसारखे चालत आहे.