Aaditya Thackeray | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष (Samajwadi Party) कधीकधी भाजपच्या 'बी टीम' सारखे वागत असल्याचा आरोप शिवसेना (Shiv Sena: UBT) नेते आदित्य ठाकरे () यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे महाविकासआघाडीत (Maha Vikas Aghadi) तणाव वाढण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा पक्षाचा विचार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आदित्य ठाकरे यांची ही टीप्पणी आली आहे. असे असले तरी त्यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर मात्र कोणताही आक्षेप घेतला नाही.

आपण अखिलेश यादव यांच्यावर बोललो नाही

आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले की, त्यांची टिप्पणी समाजवादी पक्ष अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर नाही तर पक्षाच्या महाराष्ट्र युनिटवर टीका करणारी आहे. 'अखिलेशजी लढत आहेत, पण इथे ते कधीकधी भाजपच्या बी टीमसारखे वागतात. उद्धव ठाकरे सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाताना महाराष्ट्राने पाहिले आहे. (हेही वाचा, MVA Boycott Assembly Oath Ceremony: महाविकासआघाडीचा विधानसभेतील शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार; EVM प्रकरणावरुन आदित्य ठाकरे आक्रमक)

मिलिंद नार्वेकर यांच्या सोशल मीडियावरुन तणाव

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे विधान परिषदेचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे बाबरी मशीद (Babri Masjid) घटणेवरुन वाद निर्माण झाला. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या छायाचित्रांसह, 'ज्यांनी हे केले त्यांचा मला अभिमान आहे ", असे शिवसेना संस्थापक बाळ ठाकरे यांचे उद्धरण देत, या पोस्टमध्ये बाबरी मशीद विध्वंस वर्धापन दिनाचे स्मरण करण्यात आले. नार्वेकर यांनी आपल्या एक्स (पुर्वीचे ट्विटर) खात्यावरुन ही टीप्पणी केली. (हेही वाचा, Opposition Protest on Adani Bribery Case: 'मोदी-अदानी एक है' विरोधकांचे आंदोलन, तृणमूल काँग्रेस काहीसा दूरच)

बाबरीच्या फोटोवरुन वाद

सपाचा भक्कम प्रतिसादः अबू आझमी यांनी शिवसेना (यूबीटी) वर टीका करताना म्हटले, "बाबरी मशीद उद्ध्वस्त करणाऱ्यांचे अभिनंदन करणारी पोस्ट ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. असे असेल तर, आपण त्यांच्याबरोबर का राहायचे? जर एमव्हीएमधील कोणी ही भाषा बोलत असेल तर ते भाजपपेक्षा वेगळे कसे आहेत? अशा वक्तव्यांशी आपण जुळवून घेऊ शकतो की नाही हे काँग्रेसने ठरवायला हवे, असेही ते म्हणाले.

सेनेची (यूबीटी) हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट करताना आदित्य ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या विचारधारेचा बचाव करताना म्हटले की, 'आपल्या हिंदुत्वाच्या हृदयात राम आहे आणि हातात काम आहे. ते सर्वांना एकत्र आणते. ब टीम्सने आम्हाला हिंदुत्वाची शिकवण देऊ नये.

सपा आमदाराची शिवसेना (UBT) वर टीका

समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आदित्य ठाकरे यांना उत्तर देत दोन प्रमुख चिंता व्यक्त केल्याः "पहिली गोष्ट म्हणजे, तुम्ही कट्टर हिंदुत्वाच्या विचारधारेकडे वाटचाल करत आहात का? दुसरे, तुम्हाला मते कोणी दिली? या प्रश्नांना उत्तर न देता आदित्य यांनी आरोप केले आहेत. या आरोपांचा आम्ही तीव्र विरोध करतो, असेही शेख म्हणाले.

दरम्यान, शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महा विकास आघाडीला अलीकडच्या काही महिन्यांत अंतर्गत मतभेदाचा सामना करावा लागला आहे. अलीकडील वाद हा वैचारिक मतभेद आणि सार्वजनिक विधानांमुळे निर्माण झाला आहे, ज्यामुळे आघाडीत फूट पडल्याची चर्चा आहे.