Shocking! पुण्यात भररस्त्यात तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या
Representational Image (Photo: Twitter)

पुण्यात (Pune) भरदिवसा रस्त्यात कोयत्याने वार करुन एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे ही घटना जेव्हा घडली तेव्हा रस्त्यात अनेक नागरिक उभे होते. मात्र या सर्वांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर काही काळ या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

हत्या झालेला अतुल भोसले हा म्हाळुंगे परिसरातील एका कंपनीत दोन टँकरने पाणी पुरवठा करत होता. दरम्यान, कंपनीत पाणी पुरवठा करण्यावरून आरोपी अक्षय शिवले याने मयत अतुल भोसले याना फोन करून मला त्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा आहे असे सांगितले. यावरून त्यांच्यात फोनवरच वाद झाला होता अशी माहिती पोलीस अधिकारी अरविंद पवार यांनी दिली आहे.हेदेखील वाचा- Mumbai: वांद्रे पश्चिममधील Bandra Bandstand परिसरात 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; 3 आरोपींना अटक

दुपारच्या वेळेस म्हाळुंगे येथील ममता स्वीट दुकानासमोर अतुल भोसले आल्यानंतर त्याला रस्त्यात गाठून आरोपी अक्षय शिवले आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात अतुल गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अतुलला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे अशी माहिती म्हाळुंगे पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अक्षय शिवले, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव आणि इतर तीन साथीदार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.