Mumbai Stunt Video PC TW

Mumbai Car Stunt:  मुंबईतील अंधेरी येथील घाटकोपर लिंक रोड परिसरात दारूच्या नशेत कार चालवत असताना तरुण स्टंटबाजी करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारच्या बाहेर लटकून तरुणाने स्टंटबाजी केली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला अटक केले आहे. सुरज साव असं स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सुरज हा विरार येथील रहिवासी आहे. (हेही वाचा- यूट्यूबर गुलजार शेखला अटक, व्हिडिओ बनवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर करत असे धोकादायक स्टंट - VIDEO)

मिळालेल्या माहितीनुसार, सुरजने कारच्या दरवाज्याला लटकून त्याने स्टंटबाजी केली. स्टेअरिंग हातात पकडून बाहेरून कार चालवली. एकाने हा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागताच, त्यांनी तरुणावर गुन्हा दाखल केला. या व्हायरल व्हिडिओला अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना मंगळवारी १२.४५च्या दरम्यान घडली.

या स्टंटबाजीमुळे सुरजने पार्क केलेल्या कारला धडक दिल्याची तक्रार आहे. कारने मागून धडक दिल्याने काही वाहनांचे नुकसान झाले आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. पोलिसांनी या घटनेचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर बेपर्वा वाहन चालवणे आणि दारू पिऊन कार चालवणे या संदर्भात गुन्हा दाखल केला.