Video: मुंबईतील अंधेरी परिसरात बेकायदेशीर फेरीवालांचा अतिक्रमण होत आहे. बेकायदेशी फेरीवालाच्या मालकाने एका पुरुषाला चाकू दाखवून शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर चाकू दाखवून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिस कारवाई करत आहे. (हेही वाचा- मुंबई मध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादामध्ये उंदीर आढळल्याच्या वायरल व्हिडिओ वर सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया; 'प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न म्हणत आरोप फेटाळले)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी येथील एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशनजवळ एक महिला बेकादेशीरपणे सामान विक्री करत होती. तर एका पुरुषाने या संदर्भात आवाज उठवला.त्याने फेरीवाल्यांना येथे बसण्यास मनाई केली. त्यामुळे हा वाद निर्माण झाला. पंरतु महिलेने सदर व्यक्तीला चाकू दाखवून धमकी दिली आणि शिवीगाळ केली. मुंबईतील रस्त्यांवर बेकायदेशीर फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होत असल्याचे व्हिडिओ दिसत आहे. त्या पुरुषाने ही घटना आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केली.
Enroanchment on road.
Today the illegal hawkers owner remove knife to kill
She is going to beat a man
Please remove illegal hawkers from Church road Airport metro station Andheri east@mybmc @mumbaimatterz @MumbaiPolice @mybmcWardKE @AndheriPeople @MarolMoVo @NiteshNRane pic.twitter.com/gdnrFbiY2g
— Abhinav Bharat (@AbhinavBhara) September 23, 2024
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक पुरुष महिलेला चाकू दाखवत तिला शिवीगाळ करत आहे. महिलेला रोखण्यसाठी दोन पुरुष पुढे आहे. व्हिडिओ X वर पोस्ट केला असून पोलिस आणि बीएमसी यांना टॅग केले आहे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण होत असल्याचे त्यांने पोस्टमध्ये लिहले आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया
या एक्स पोस्टला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी पुढील कारवाई एमयाडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी करतील. या घटनेची माहिती त्यांना देण्यात आली आहे. बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करताना, BMC ने अंधेरी पश्चिमेतील 14 ठिकाणे साफ केली. या भागात एसव्ही रोड, अंधेरी स्टेशन परिसर, सीडी बर्फीवाला रोड आणि एन दत्त ॲप्रोच रोड यांचा समावेश आहे.