Thane: ठाण्यातील तरुणाला ऑनलाइन शॉपिंग करण पडलं महागात; 46 हजार रुपयांचा स्मार्टफोन ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरीमध्ये मिळाला साबण
Mobile Phone Representational Image (Photo Credits: Pixabay)

Thane: ठाण्यातील (Thane) एका 25 वर्षीय व्यक्तीने ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) प्लॅटफॉर्मवरून 46,000 रुपये किमतीचा स्मार्टफोन ऑर्डर केला. परंतु त्याला दिलेल्या पार्सलमध्ये तीन साबण (Soap) बार मिळाले. पार्सल वितरणासाठी जाताना कोणीतरी छेडछाड करून पीडित तरुणाची फसवणूक केल्याची माहिती भाईंदर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिली आहे. या व्यक्तीने ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून 46,000 रुपये किमतीचा आयफोन ऑर्डर केला होता.

आयफोनऐवजी मिळाले तीन साबण -

प्राप्त माहितीनुसार, 9 नोव्हेंबर रोजी पीडित तरुणाने जेव्हा त्याला दिलेले पॅकेज उघडले तेव्हा त्याला मोबाईल फोनच्या बॉक्समध्ये डिश धुण्यासाठी वापरलेले तीन साबण बार आढळले. पीडित तरुण फोटोकॉपीच्या दुकानात काम करतो. (हेही वाचा -Mumbai Air Pollution: मुंबई वायू प्रदूषणामुळे कहर! BMC ने 278 बांधकाम स्थळांना जारी केल्या काम थांबवण्याच्या नोटिसा)

पोलिसांनी शनिवारी अज्ञात गुन्हेगाराविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. यापूर्वीदेखील ऑनलाईन फसवणूकीच्या घटना समोर आल्या आहेत.

एका सर्वेक्षणानुसार, सणासुदीच्या खरेदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंगदरम्यान ग्राहक फसवणूकीचे बळी ठरत आहेत. 88 टक्के प्रतिसादकर्ते खरेदी करण्यापूर्वी ऑनलाइन विक्रेता रेटिंग तपासण्याला प्राधान्य देतात, तथापि, हॉलिडे शॉपिंग स्कॅममध्ये गमावलेली सरासरी रक्कम 20,000 पेक्षा जास्त आहे. ग्राहक सायबर सेफ्टी ब्रँड नॉर्टनने गुरुवारी त्याचा नवीनतम सायबर सेफ्टी इनसाइट्स अहवाल प्रसिद्ध केला.