Pune PC X

Pune: पुण्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू  (Death) झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रविवारी ईद ए मिलाद सण साजरा करताना तरुणाचा मृत्यू झाला. तरुण मिरवणूकीत नाचत होता, ध्वजारोहण करत होता तेवढ्यात अचानक कोसळला. या घटनेनंतर मिरवणूकीत एकच खळबळ उडाली होती. (हेही वाचा- ऑनलाइन गेमने घेतला कॅब ड्रायव्हरचा जीव; खेळातील टास्क पूर्ण करण्यासाठी व्यक्तीने मारली Bandra-Worli Sea Link वरून उडी)

मिळालेल्या माहितीनुसार, ईद ए मिलाद मिरवणूकीत दोन तरुण डीजे ट्रकवर चढले होते आणि झेंडा घेऊन नाचत होते. तेवढ्यात झेंडा चूकून हाय-व्होल्टेज विजेच्या तारांच्या संपर्कात आला. मृत व जखमी तरुणांची नावे अद्याप समजलेली नाहीत. ही घटना पुणे शहरतील वडगाव शेरी परिसरातील आनंद पार्के येथे घडली. रविवारी सकाळी ही मिरवणूक निघाली तेव्हा ही घटना घडली.

या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, अचानक ध्वजाचा विद्युत तारांशी संपर्क झाला, त्यामुळे डीजेवर नाचत असलेली दोन्ही तरुणांना विजेचा धक्का बसला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.