Pune: पुण्यातील तृतीयपंथीयाचे खळबळजनक कृत्य, एका महिलेचे भररस्त्यात फाडले कपडे
CRIME | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेला एका तृतीयपंथीयाने जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच या महिलेचे भररस्त्यात कपडे फाडून तिच्याशी गैरवर्तन केल्याचे समजत आहे. ही घटना पुण्यातील (Pune) उत्तमनगर (Uttamnagar) परिसरात शनिवारी (3 जुलै 2021) घडली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या तृतीयपंथीयाने 40 वर्षीय महिलेला मारहाण केल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला उत्तमनगर परिसरातील एका भाजी विक्रीच्या दुकानासमोर बसल्या होत्या. तेव्हा त्याठिकाणी एक तृतीयपंथी व्यक्ती आला. त्याने महिलेच्या पर्समधून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य एका महिलेने त्यांच्यातील भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. यावर संतापलेल्या तृतीयपंथी व्यक्तीने मध्यस्थी करणाऱ्या महिलेलाही मारहाण करत त्यांचे भररस्त्यात कपडे फाडले आहेत. हे देखील वाचा-Online Fraud in Mumbai: हॉस्पिटलमध्ये दाखल असताना वृद्ध व्यक्तीच्या अकाऊंटमधून तब्बल 41 लाख लंपास

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणी पीडित महिलेने उत्तरनगर पोलिसांत तृतीयपंथीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे करत असल्याची माहिती न्युज 18 लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे.