Mahesh Landage Video: धावत्या कारवर कोसळलं झाड, भरपावसात आमदार महेश लांडगे धावले मदतीसाठी, व्हिडिओ व्हायरल होताच PMCने घेतली दखल
mahesh Landge Video PC TWITTER

Mahesh Landage Video: महाराष्ट्र राज्यातील काही ठिकाणी वातावरणात कमालीचे बदल होत आहे. काल पुण्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली होती. सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पुण्यातील रस्त्यांवर झाडे कोसळले होते. यात पुण्यातील विमाननगर- सिंम्बायोसिस रोडवर अवकाळी पावसामुळे चालत्या कारवर झाड कोसळले. हे पाहून पुण्यातील भोसरी येथील आमदार मदतीसाठी धावले. (हेही वाचा-INDIA आघाडी लोकसभा निवडणूक जिंकल्यास राम मंदिराचे शुद्धीकरण करू)

त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळीस प्रसंगावधान राखत आपत्तीग्रस्त वाहनचालक व प्रवाशांना तात्काळ मदत महेश लांडगे यांनी केली. या व्हिडिओवर अनेकांनी कंमेट केले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एका कार झाड कोसळल्या प्रवाशी आणि कार चालक अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी भरपावसात महेश लांडगे यांनी कारमधून उतरून धावत त्यांची मदत केली.  महेश लांडगे यांना हा व्हिडिओ स्वत:च्या Xच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला. त्यात त्यांनी पुण्यातील पीएमसीला ( पुणे महानगर पालिका) टॅग केले होते.

पहा व्हिडिओ

व्हिडिओत त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून आपत्ती व्यवस्थान विभागाने सतर्क रहावे असा इशारा दिला आहे. पीएमसीने यात दखल घेतली असून तक्रार नोंदवून घेतला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी महेश लांडगे यांचे कौतुक केले आहे.