Two headed Russell’s Viper Rescued In Maharashtra: कल्याण येथे आढळला घोणस प्रजातीचा दुतोंडी विषारी साप; पाहा संपूर्ण व्हिडिओ
Two headed Russell’s Viper (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रातील (Maharashtra) कल्याण (Kalyan) येथे गुरुवारी एक घोणस प्रजातीच्या (Russell’s Viper) दोन तोंडाचा विषारी साप सापडला आहे. कल्याण पश्चिम येथील रौनक सिटीजवळील एका फुटपाथजवळ काही नागरिक फिरण्यास आले असताना त्यांना हा साप दिसला होता. दरम्यान, स्थानिकांनी सर्प मित्रांना फोनद्वारे याची माहिती दिली आहे. त्यानंतर वाॉर रेस्क्यू फॉऊंडेशनमधील सर्पमित्रांनी घटनास्थळी येऊन सापाला ताब्यात घेतले आहे. हा साप परळच्या हाफकीन संस्थेला देण्यात येणार आहे. भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

कल्याण येथे आढळलेल्या या सापाची 11 सेंटीमीटर लांबी आहे. तर, त्याचे प्रत्येकी डोके 2 सेंटीमीटर लांबीचे आहेत. तर, या सापाची रुंदी 1 सेंटीमीटर आहे. रसेल साप हा भारतात आढळणाऱ्या विषारी सापांपैकी एक आहे. हा साप परळच्या हाफकीन संस्थेला देण्यात येणार आहे. दरम्यान, सुशांत नंदा यांनी ट्विटरच्या वर या सापाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच हा दुर्मिळ साप जंगलात खूप कमी प्रमाणात आढळून येतात, असेही त्यांनी कॅप्शन दिले आहे. हे देखील वाचा- #Video: कल्याण मध्ये भर रस्त्यात आढळला दोन तोंडाचा घोणस साप

सुशांत नंदा यांचे ट्वीट-

कल्याणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे व वनपाल जाधव यांच्या ताब्यात या सापाला सोपविण्यात आले आहे. पशुवैदयकीय अधिकारी डॉ. धर्मा रायबोले यांनी त्याची प्राथमिक तपासणी केली आहे. सदर साप सुस्थितीत असून त्यांच्या देखरेखीखाली आहे. सध्या हा साप वॉर रेस्क्यू फाऊंडेशनच्या ताब्यात सांभाळण्यासाठी देण्यात आला आहे. कल्याणच्या वन विभागाकडून पुढील सूचना मिळेपर्यंत आम्ही सांभाळ करू, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी दिली आहे.