A pregnant woman gave birth to a child at Igatpuri railway station (Photo Credit: ANI)

मुंबई- वाराणसी विशेष ट्रेनमधून पवास करणाऱ्या एका महिलेची इगतपुरी रेल्वे स्थानकात प्रसूती करण्यात आली आहे. मुंबई-वाराणसी ट्रेनमधून प्रवास करत असताना संबंधित महिलेला प्रसूती कळा येत असल्याने तिला रुग्णालयात तातडीने दाखल करणे गरजेचे होते. रेल्वे प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर रेल्वे वैद्यकीय पथकाच्या मदतीने या महिलेने इगतपुरी स्थानकात गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळ आणि आई दोघेही सुखरुप असून पुढील उपचारासाठी त्यांना इगतपुरी ग्रामीम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या कामगिरीमुळे रेल्वे वैद्यकीय पथकाचे कौतूक केले जात आहे.

तेलंगणा इथल्या गुंडला भागात धुवांधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. नदीवरचा पूल वाहून गेल्याने चिंता निर्माण झाली होती. याचदरम्यान 25 जुलै रोजी एका गर्भवती महिलेला रुग्णालयात जायचे असल्याने नदी कशी ओलांडायची हा प्रश्न निर्माण झाला. पूल वाहून गेल्याने कोणतीही मदत मिळण्याची शक्यता अगदी कमी होती. अशावेळी गावातील काही सदस्य आणि नातेवाईकांनी पुढे येऊन या महिलेची मदत केली होती. हे देखील वाचा- दादर रेल्वे स्टेशनमध्ये महिलेची फलाटावरच प्रसूती

एएनआयचे ट्वीट-

कोरोनामुळे अनेकांवर मोठे संकट ओढवले आहे. मात्र, या कालावधीत गर्भवती महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावा लागत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. ज्यामुळे गर्भवती महिलांना वेळोवेळी रुग्णालयात जाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महाराष्ट्रात गर्भवती महिलेला रस्ते आणि वाहतुकीची सुविधा नसल्याने 28 किलोमीटर चालायला लागल्याची माहिती समोर आली होती .