कोरोना विषाणूने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणू नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून 170 हून अधिक देश प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अनेक देशात संचारबंदीचा पर्याय निवडला आहे. यात भारताचाही समावेश आहे. संचारबंदीत (Lockdown) अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात येते. यातच दारूची तलफ झालेल्या एका तळीरामाने चक्क दारूचे दुकानेच फोडले असल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोलापूर (Solapur) येथील दावत चौकातील असलेले दुकानात घडली. दरम्यान, आरोपी महागड्या वाईनची लूट करत 30 हजारांची रोकड पळवली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी विजापूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोहेल शेख असे या आरोपीचे नाव असून तो सोलापूर येथील रहिवाशी आहे. संचारबंदीमुळे सध्या वाईन शॉप बंद आहे. यातच दारूची तलफ असणाऱ्या सोहेलने शहरातील वाईन शॉप फोडून ब्रॅंडेड वाईनच्या वाटल्या चोरी केल्या. याशिवाय, सोहेलने जाता-जाता वाईन शॉपमधून 30 हजारांची रोकडदेखील पळवली. रोकडसह एकूण 56 हजारांची चोरी झाल्याची तक्रार वाईन शॉपच्या मालकाने पोलिसांत नोंदवली आहे. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या तपासून आरोपी सोहेलला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. संचारबंदीच्या कालावधीत विजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीने घटना समोर आल्या आहेत. संचारबंदीमुळे घरे, दुकाने बंद असल्याची संधी साधून चोरटे पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. हे देखील वाचा- Coronavirus: अहमदनगर येथे कोरोना विषाणूचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या आरोग्यसेविकांना धक्काबुक्की; 3 जणांविरोधात गुन्हा दाखल
जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 6 लाख 97 हजार 244 वर पोहचली आहे. यांपैकी 32 हजार 257 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 45 हजार 696 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 108 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 42 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 101 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 225 वर पोहचली आहे. यात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.