प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Pixabay)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यातच कोरोनाचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या आरोग्येसेविकांना (Heathcare Workers) धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील मुंकुंदनगर (Mukundnagar) परिसरात घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी संपूर्ण देशात 21 दिवसांतकरिता संचारबंदीची घोषणा केली आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण देशात बंद घोषीत करण्यात आला आहे. देशात अतिशय धोक्याचे वातावरण असतानाही अत्यावश्यक सेवेंचा पुरवठा केला जात आहे. मात्र, अहमदनगर येथील घटनेने संपूर्ण देशाला हादरून टाकले आहे.

कोरोना विषाणूच्या संकटाचे प्रमाण अधिकच वाढत चालले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणारेही महत्वाची भुमिका बजावत आहेत. मात्र, अहमदनगरमध्ये कोरोना विषाणूचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या आरोग्यसेविकांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगर येथील मुकुंदनगर परिसरात नुकतेच 2 कोरोनाबाधीत रुग्ण सापडले होते. यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, याकरिता काही आरोग्यसेविका अहमदनगर येथील मुकुंदनगर येथे सर्वेक्षणासाठी गेल्या होत्या. मात्र, त्या ठिकाणी आरोग्यसेविकांना नागरिकांनी धक्काबुक्की केली. याप्रकरणी 3 जणांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशात कोरोनाचे संकट वावरत असताना डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करत आहेत. मात्र, त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला आहे. हे देखील वाचा- COVID-19 च्या मृतदेहांच्या अंत्यविधीबाबत BMC कडून प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक नवाब मलिक यांच्या मागणीवरुन घेण्यात आले मागे

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 6 लाख 97 हजार 244 वर पोहचली आहे. यांपैकी 32 हजार 257 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 45 हजार 696 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 108 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 42 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 101 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 225 वर पोहचली आहे. यात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.