Vashi Abuse Case: वाशी बस स्टॉपवर 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीसमोर एका व्यक्तीचे गैरवर्तन, आरोपीचा शोध सुरू
Women Harassment( FIle photo)

नवरत्न हॉटेलसमोरील (Navratna Hotel) वाशी बस स्टॉपवर (Vashi Bus Stop) सोमवारी सायंकाळी 40 वर्षांच्या एका व्यक्तीने 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीसमोर गैरवर्तन (Abuse) केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतून समोर आली आहे. वृत्तानुसार, मुलगी दुपारी 4 वाजता घरी परतण्यासाठी बस स्टॉपवर थांबली होती. तेव्हा तिच्या जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीने त्याची पॅन्ट अनझिप केली आणि गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. मुलीने याबाबत त्याच्याजवळ विचारणा केल्यावर तो तेथून पळून गेला. हेही वाचा Target Killing in Kashmir: J&K च्या Shopian भागातील Apple Orchid मध्ये कश्मिरी पंडीत भावांवर दहशतवाद्यांकडून हल्ला; एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी

वृत्तानुसार, मुलीने ही घटना तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आणि तिच्या वडिलांसोबत तिचा त्रास शेअर केला. यानंतर त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.