Mumbai: 80 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह पवईतून एका व्यक्तीला अटक
Currency Notes | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

पवई (Powai) येथे मंगळवारी 80 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह (Fake note) एका व्यक्तीला अटक (Arrested) करण्यात आली. पालघर (Palghar) जिल्ह्यातील उमरोली (Umroli) परिसरातील सौजन्ना भुसन पाटील असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट 10 चे पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांना एक व्यक्ती बनावट नोटा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. सावंत आणि त्यांच्या पथकाने त्यानुसार पवईतील साकी विहार रोडवरील आंबेडकर गार्डनजवळ सापळा रचून संशयिताला पकडले आणि त्याच्या ताब्यातून बनावट नोटा जप्त केल्या, असे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले. पाटील याच्याकडे 500 रुपयांच्या 16,000 बनावट नोटा होत्या. ज्या त्याला दुसऱ्या संशयिताकडे सोपवायच्या होत्या.

बनावट नोटा छापणाऱ्या सिंडिकेटमध्ये चार ते पाच जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्यापैकी एक सूत्रधार नाशिकचा असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूत्रधाराने पाटील यांना 10 टक्के कमिशन देऊन बनावट नोटा बाजारात चलनात आणण्यासाठी राजी केले होते. हेही वाचा New Year Celebration in Mumbai: थर्टी फर्स्ट निमित्त मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; 10 हजारहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

पाटील याने चौकशीत दावा केला की, तो पहिल्यांदाच बनावट नोटांचा व्यवहार करत होता. मात्र, यापूर्वीही त्याने बनावट नोटा वितरित केल्याचा संशय पोलिसांना आहे. बुधवारी पाटील यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.