नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपूरी (Igatpuri) परिसरात एका बिबट मादीने (Female Leopard) चार बछड्यांना जन्म दिला आहे. इगतपुरी येथील नांदगावसदो गावाच्या डोंगर पायथ्याजवळ असलेल्या एका रिकाम्या घरात मादी बिबट्याने चार बछड्यांना जन्म दिला. ही घटना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर नागरिकांना त्याची वनविभागाला कल्पना दिली. बिबट मादी (Leopard) आणि तिचे चार बछडे व्हिडिओत कैद झाले आहेत. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिबट मादी आणि तिचे चार बछडे असे सर्वजण सुरक्षीत आणि निरोगी आहेत.
नाशिकमध्ये बिबट्या दिसल्याची किंवा त्याचा वावर आढळल्याची ही पहिच घटना नाही. काही दिवसांपूर्वीच नाशिक येथील चाडेगाव-चेहेडी शिव रस्तावरील नारायण आरिंगळे यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचे आढळले होते. नागरी परिसरात बिबट्या दिसल्याच्या घटना आता सर्रास घडू लागल्या आहेत. ग्रामिण भागच काय तर अनेकदा शहरातही बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. या बिबट्यांना वन विभागाचे अधिकारी पकडून त्यांना पुन्हा एकदा जंगलात सोडातात. (हेही वाचा, अकोला: आई आलीच नाही! बकरीच्या दूधावर बिबट्याच्या बछड्यांची गुजराण)
#WATCH Maharashtra: A leopard gave birth to four cubs inside a hut in Igatpuri area of Nashik yesterday. Forest Official says, "all the cubs are healthy and safe." (Video Source: Forest Department) pic.twitter.com/AMA5xXLNHJ
— ANI (@ANI) August 18, 2020
आजकाल नागरी परिसरत बिबट्या दिसणे फारसे नवे राहीले नाही. खरे तर नागरि परिसरात बिबट्या अथवा जंगली प्राणी दिसला असे म्हणने तसे काहीसे त्या प्राण्यांवर अन्यायकारकच. कारण, मानवानेच जंगल परिसरात नको तितके अतिक्रमण केले आहे. परिणामी प्राणि मानवी परिसरात प्रवेश करु लागले आहेत. निसर्ग आणि जंगलच्या नियमानुसार प्राणी आपल्या हद्दीतच फिरतात आपल्याला वाटते ते मानवी परिसरात आले.