Mumbai High Tide Today: मुंबईत गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून या पावसाने मुंबईतील अनेक भागातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांनी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसासोबत सोसाट्याचा वारा सुटल्याने कुठे हॉस्पिटल, घरांचे पत्रे उडाले तर कुठे रस्त्यांवर वॉटर लॉगिंगची समस्या निर्माण झाली आहे. पावसाचा हा जोर आजही कायम राहणार असून आज दुपारी मुंबईतील समुद्रात मोठी भरती येणार आहे असे IMD विभागाने सांगितले आहे. यामुळे समुद्रात 4.33 मीटर उंचीच्या लाटा उसळणार मुंबईकरांनी आवश्यक ती काळजी घ्यावे असे आवाहना हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.
मुंबईत पावसाने अक्षरश: हैदोस घातला असून मुंबईत मागील 24 तासांत पडलेल्या पावसाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. लॉकडाऊन मुळे आवश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य मुंबईकर घरातच असल्यामुळे मुंबईकरांना तेवढा संकटाचा सामना करावा लागला नाही. मात्र या पावसामुळे सखल भागात राहणा-या अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आज देखील मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील 3 तासांत मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
#Mumbai's Colaba received 331.8mm rainfall in the last 24 hours. A high tide of 4.33mtr expected at 1351 hours today: India Meteorological Department
— ANI (@ANI) August 6, 2020
आज पहाटे 5 पर्यंत सांताक्रुझमध्ये 146.1mm तर कुलाबा येथे 330.0mm पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान आजही पालघर, मुंबई आणि ठाण्यात ढगाळ वातावरणासह पावसाची संततधार सुरु आहे.
मुंबई सह उपनगरात तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, कोकण, तळकोकण भागात कालच्या दिवसभरात पाऊस चांगलाच जोर धरून कोसळत होता. पुढील 48 तास सुद्धा हीच परिस्थिती कायम राहील असे अंदाज हवामान खात्याने वर्तवले आहेत. मुंबईतील अरबी समुद्राच्या वर ढगाळ वातावरण असल्याने काही भागात आज कालच्या पेक्षाही मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता आहे.