Boat Crash In Dahanu: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाने समुद्राला उधाण आले आहे. त्यामुळे प्रशासनाने समुद्र किनारी जाण्यासाठी नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीतील परिसरातील मच्छिमारांनाही 31 जुलै पर्यंत मासेमारीवर बंद केली आहे. दरम्यान प्रशासनाने मनाई केली असताना देखील डहाणूतील (Dahanu) दोन तरुणांनी समुद्रात बोटीने जाणे ठरवलं. असं धाडस करणे त्यांच्या अंगाशी बेतलं आहे. दोन तरुणांपैकी एक जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.
मासेमारी गेलेली बोट दुर्घटनाग्रस्त झाली आहे. या दुर्घटनेत एका तरुण बेपत्ता झाला आहे. तर दुसरा तरुण पोहत किनाऱ्याजवळ पोहचला अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. कोस्ट गार्ड कडून बेपत्ता मुलाचा शोध चालू आहे. जून आणि जुलै महिन्यांसाठी मासेमारी बंदी ठेवण्यात आली आहे. डहाणू येथून दोघे बोटीतून निघाले असताना काही अंतर पुढे गेल्यावर बोट दुर्घटनाग्रस्त झाली. या बोटीतील एक तरुण जीव वाचवत किनाऱ्यावर आला. तर दुसरा तरुण बेपत्ता झाला आहे. बेपत्ता झालेल्या तरुणाचा कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टर मार्फत शोध घेतला जात आहे.
अद्यापही बेपत्ता मुलाचा शोध लागला नसल्याची माहिती कोस्ट गार्ड कडून देण्यात आली आहे. भूपेंद्र अंभिरे असं बेपत्ता तरुणाचं नाव आहे. त्याच्यासोबत असलेला संजय पाटील हा तरुण पोहत समुद्रकिनाऱ्यावर पोहचला. यानंतर कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरमधून बेपत्ता तरुणाची शोध मोहीम हाती घेण्यात आली.