Mumbai Fire: मुंबईमध्ये धोबी तलाव जवळील Hotel Fortune येथे आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

सध्या महाराष्ट्र कोरोना विषाणूची लढत आहे, अशात इतरही काही दुर्दैवी घटना घडतात ज्यामुळे सरकारवरील ताण अजूनच वाढत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या (Mumbai) मेट्रो सिनेमाच्या समोर असलेल्या हॉटेल फॉर्च्युनला (Hotel Fortune) आग (Fire) लागल्याची माहिती मिळत आहे. याठिकाणी कोविड ड्युटीवरील निवासी डॉक्टरांना पर्यायी निवासस्थाने दिली जातात. सध्या बचाव कार्य चालू असून, अजूनतरी कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही. धोबी तलाव येथील हॉटेल फॉर्च्युन इमारतीच्या दुसर्‍या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनास्थळी 5 फायर इंजिन आणि 4 जंबो टाक्या पोहचल्या आहेत.

आतापर्यंत 5 लोकांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. ही आग नक्की कशामुळे लागली याची करण समजू शकले नाही. वरच्या मजल्यांमध्ये अजूनही काही डॉक्टर अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाचे काम युद्धापातळीवर सुरु आहे. नागपाडा परिसरातील Quarantine साठी वापर होणाऱ्या Rippon Hotel मध्ये आग; Coronavirus रुग्णांना सुखरूप बाहेर काढले

एएनआय ट्वीट -

बुधवारी रात्री उशिरा ही आग लागली. यावेळी या ठिकाणी सुमारे 25 निवासी डॉक्टर होते. मात्र या घटनेमुळे कोणीही जखमी झालेले नाही आणिथोड्या वेळाने सर्व डॉक्टरांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आल्याचे, मुंबई फायर ब्रिगेडने सांगितले आहे. या आधी दक्षिण मुंबईच्या नागपाडा (Nagpada) परिसरातील बेलासिस रोडवरील रिपन हॉटेल (Rippon Hotel) मध्ये आग लागली होती. ही आग हॉटेलच्या लॉजिंग रूममध्ये लागली जिथे कोरोना व्हायरस संबंधीच्या पेशंट्सना वेगळे ठेवण्यात आले होते.