BEST bus and Police Van Accident (PC - Twitter)

New Mumbai: नवी मुंबईतील वाशी परिसरात बेस्टची बस (BEST Bus) आणि पोलिस व्हॅन (Police Van) ची समोरासमोर धडक होऊन बसचे वाहनावरील नियंत्रण सुटले. समोरासमोर झालेल्या धडकेत पोलीस व्हॅनचा चालक आणि बस चालक जखमी झाला. दोघांना किरकोळ दुखापत झाली. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास वाशीतील अरेंजा चौकात हा अपघात झाला. अपघाताचे व्हिज्युअल सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोन्ही वाहनांचा समोरासमोर धडक झाल्याचे दिसत आहे.

पोलिस व्हॅनमधील कर्मचारी महाराष्ट्राच्या पावसाळी विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी मुंबईला जात होते. सुरक्षा दलाच्या चालकाने प्रवाशांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. (हेही वाचा - Irshalwadi Landslide: रायगड मधील इर्शाळवाडी परिसरात NDRF च्या मदतीला श्वानपथक; पहा बचावकार्याची ताजी दृष्य (Watch Video))

एपीएमसी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या हवाल्याने लोकमतने सांगितले की, कार अपघातातील अवशेष रस्त्यावरून हटवण्यात आले असून वाहतूक सुरळीत झाली आहे.