Thane Cyber Crime: अंबरनाथमध्ये 76 वर्षीय व्यक्तीला घातला 4.65 लाखांचा ऑनलाइन गंडा, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
Online Fraud | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

सोशल मीडियावर महिला असल्याचे भासवून एका अज्ञात व्यक्तीने अंबरनाथ (Ambernath) येथील एका 76 वर्षीय व्यक्तीला 4.65 लाख रुपयांचा गंडा (Fraud) घातला आहे. हे पैसे त्या व्यक्तीच्या निवृत्तीचे पैसे होते. एका व्यक्तीने या पीडितला  रोमँटिक मेसेजचे आमिष दाखवले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीनी दिलेल्या पाच वेगवेगळ्या खाते क्रमांकावर रोख रक्कम पाठवली. त्यांनी त्याला सांगितले की हे पैसे मुंबई विमानतळावरील कस्टम कार्यालयात (Custom offices) अडकलेल्या मुलीची सुटका करण्यासाठी होते. पण नंतर त्याला फसवणूक (Cyber Crime) झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध अंबरनाथ पोलिस ठाण्यात (Ambernath Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार पास्कल गोन्साल्विस यांची फेसबुकवर मिस एथाड या युजरची भेट झाली.  अंबरनाथ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मैत्री झाली आणि अनेकदा गप्पा झाल्या. अलीकडेच एथाडने गोन्साल्विसला सांगितले की ती त्याला आश्चर्यचकित करण्यासाठी मुंबईत आली होती. परंतु एका कस्टम अधिकाऱ्याने तिच्यासाठी आणलेल्या महागड्या भेटवस्तूसाठी तिला ताब्यात घेतले. हेही वाचा Amravati Violence: अमरावती हळूहळू पुर्वपदावर; इंटरनेट सेवा सुरु, मात्र संचारबंदी कायम

नंतर त्याला एका वेगळ्या नंबरवरून कस्टम अधिकारी म्हणून फोन आला आणि एथाडला सोडायचे असल्यास भेटवस्तूसाठी दंड भरण्यास सांगितले. अंबरनाथ पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदार घाबरले आणि त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वागले. त्यानंतर आरोपींनी त्याला वेगवेगळ्या बँक खात्यांचे तपशील पाठवले, विविध वस्तूंवर वेगवेगळे दंड आकारण्यात आले आणि त्याला ताबडतोब रोख रक्कम हस्तांतरित करण्यास सांगितले.

तक्रारदार ज्याने इतके वर्ष आपले सर्व उत्पन्न वाचवले ते यात अडकले आणि 4.65 लाख गमावले. नंतर त्यांनी एथाडला फोन करण्याचा प्रयत्न केला पण नंबर आला नाही.  तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तो आमच्याकडे आला आणि पाच लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला ज्यांच्याकडे पाच बँक खाते क्रमांक आहेत ज्यांना त्याने पैसे ट्रान्सफर केले, असे पोलिसांनी सांगितले.