प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक परांजपे बिल्डर्स (Paranjape Builders) यांना काल (24 जून) रात्री मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान ही अटक नसून केवळ चौकशी असल्याची माहिती डीसीपी Manjunath Singe यांनी ANI वृत्तसंस्थेला बोलताना दिली आहे. एका महिलेने परांजपे बिल्डर्स वर फसवणूक आणि बनावट दस्ताएवज केल्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सध्या याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मुंबईच्या विलेपार्ले पोलिस स्टेशन मध्ये 70 वर्षीय महिलेने तक्रार केली आहे. त्यानुसार, शशांक परांजपे आणि श्रीकांत परांजपे यांना त्यांच्या पुण्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. या महिलेच्या तक्रारीमध्ये माधव परांजपे आणि राघवेंद्र पाठक यांची देखील नावं आहेत. जानेवारी 2020 मध्ये अशाच प्रकारे आरोपींवर फसवणूक आणि बनावट कागदपत्र बनवल्याची अजून एक तक्रार आहे. त्या प्रकरणाचा देखील अधिक तपास सुरू आहे. नक्की वाचा: पुणे: मास्कचा गैर फायदा घेत पतीने हडप केली पत्नीच्या नावे असलेली सारी संपत्ती.
ANI Tweet
A 70-year-old woman lodged a case against builders Shrikant Paranjape and Shashank Paranjape alleging cheating and forgery, late last night. "We called them for inquiry, can't call it an arrest. Further action to be taken on the basis of probe," said Manjunath Singe, DCP Mumbai pic.twitter.com/P7LtZU240r
— ANI (@ANI) June 25, 2021
मुंबई पोलिसांकडून सध्या श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे आणि आर पाटील यांच्या विरूद्ध कलम 406, 420, 464, 467, 468 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई, पुण्यात अनेक मोक्याच्या ठिकाणी परांजपे बिल्डर्सची कामं सुरू आहेत.