Wall Collapse (फोटो सौजन्य - Pixabay)

Wall Collapse In Mumbai: सोमवारी दुपारी काळबादेवी (Kalbadevi) परिसरातील चिरा बाजार येथील अरुंद गल्लीत कंपाउंडची भिंत कोसळून (Wall Collapse) दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला आहे. ही भिंत साधारण 7 फूट उंच होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी 2:38 च्या सुमारास घडली.

अंदाजे 5-7 फूट उंच आणि सुमारे 30 फूट लांब एक कंपाऊंड भिंत शेजारच्या लेनवर पडली. मुंबई अग्निशमन दलाने (MFB) ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांसाठी शोध आणि बचाव कार्य केले, असं बीएमसी अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा - Vasant Vihar Wall Collapsed: दिल्लीतील वसंत विहार परिसरात बांधकाम ठिकाणी भिंत कोसळली, एकाचा मृतदेह सापडला)

ढिगाऱ्याखाली तीन जण अडकल्याची माहिती मिळाली आहे. मरीन लाइन्समधील जीटी हॉस्पिटलने पुष्टी केली की एकूण तीन लोकांना रुग्णालयात आणण्यात आले होते. पोहोचल्यावर दोघांना मृत घोषित करण्यात आले, तर एकाला जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले. (हेही वाचा - Gujarat School Wall Collapsed: मधल्या सुट्टीत जेवताना शाळेची भिंत कोसळली, सहा विद्यार्थी जखमी)

मुंबईतील काळबादेवी येथे भिंत कोसळली - 

प्राप्तमा माहितीनुसार, विनयकुमार निषाद (वय, 30) आणि रामचंद्र सहानी (वय, 30) अशी मृतांची नावे आहेत. सनी कनोजिया (वय,19) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारी म्हणून बीएमसीने परिसराची नाकेबंदी केली होती.