Nagpur Shocker: आज सर्वत्र जागतिक हृदय दिन (World Heart Day 2024) साजरा होत असताना नागपूर (Nagpur) मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका मोठ्या आयटी फर्म (IT Firm) मध्ये काम करणाऱ्या एका 40 वर्षीय कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac Arrest) निधन झाले. ही घटना शुक्रवारी घडली. नितीन एडविन मायकल (Nitin Edwin Michael) असं या मृत तरुणाचं नाव आहे.
नितीन हे एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम करत होते. सोनेगाव पोलिस स्टेशनच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयाच्या मिहान परिसरात असलेल्या वॉशरूममध्ये प्रवेश केल्यानंतर संध्याकाळी 7 च्या सुमारास तो प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले. (हेही वाचा - World Heart Day 2024: निरोगी हृदयासाठी परिपूर्ण आहार कसा असावा? जागतिक हृदय दिनानिमित्त जाणून घ्या खास टिप्स, पहा व्हिडिओ)
सहकाऱ्यांनी त्यांना नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) नेले. तेथे पोहोचल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. सोनेगाव पोलिसांनी शवविच्छेदन करून आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक शवविच्छेदन निष्कर्षावरून असे दिसून येते की, हृदयविकाराचा झटका हे नितीनच्या मृत्यूचे संभाव्य कारण आहे. (हेही वाचा - Lipid Guidelines in India: भारतामध्ये पहिल्यांदाच 'लिपिड गाईडलाईन्स' जारी; High cholesterol हा सायलंट किलर!)
पोलीस सध्या या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. मायकेलच्या पश्चात पत्नी आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. आज जगभरात जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. अयोग्य जीवनशैली आणि सकस आहाराची कमतरता यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजारांना आमंत्रण मिळते. हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग्य व सकस आहार घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे हृदयाशी संबंधीत आजार आणि धोके टाळता येतात.