Govt Officer Suicide In Mumbai: 36 वर्षीय सरकारी अधिकाऱ्याची मुंबईतील अँटॉप हिल इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
Suicide | (Photo Credits: Pixabay)

Govt Officer Suicide In Mumbai: मुंबईतून (Mumbai) अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 36 वर्षीय सरकारी अधिकाऱ्याने रविवारी अँटॉप हिल (Antop Hill) येथे आत्महत्या (Suicide) करून जीवन संपवले. पंकज केशव, असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. मृत पंकज हे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागात (CPWD) नियुक्त अधिकारी होते. त्यांनी परिसरातील गृहनिर्माण संस्था साई को-ऑपच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्यांच्या पश्चात दोन मुले असल्याचे सांगण्यात येत आहे.

हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांनी पंकज तेथील सदस्य नसल्याचे सांगितलं आहे. पंकजने संध्याकाळी आवारात प्रवेश केला आणि चौथ्या मजल्यावरील दरवाजाची बेल वाजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने पायऱ्यांच्या लॉबीवरून उडी मारली. (हेही वाचा -School Watchman Rapes 4 Yr Old Student: लाजिरवाणे कृत्य! कांदिवलीत शाळेच्या वॉचमनने केला 4 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपीला अटक)

आत्महत्येच्या प्रयत्नात पंकज जखमी झाला. त्यानंतर त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही तासांनंतर रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी पंकजच्या आत्महत्या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. (हेही वाचा - Palghar Accident Video: पालघरमध्ये हायवे क्रॉसिंग करताना वेगवान कारने दिली दुचाकीला धडक, पहा हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ)

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तथापी, पोलिस पंकजच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वीदेखील मुंबईतील उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.