Mumbai: गुरे चोरून कत्तलखान्यात विक्री करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाला अटक
Arrest (PC -Pixabay)

Mumbai: नवी मुंबईत (New Mumbai) अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने गायी चोरून (Stealing Cattle) कत्तलखान्यात विकल्याच्या आरोपाखाली एका 24 वर्षीय तरुणाला अटक (Arrest) केली आहे. गुरे चोरीच्या किमान तीन गुन्ह्यांची उकल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नूर मोहम्मद इसाक काची उर्फ पापा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोहम्मद काची हा पनवेल येथील कच्ची मोहल्ला येथील अल मारवा बिल्डिंगमध्ये राहतो. मोहम्मद हा नवी मुंबईतील गोठ्यातील गायी चोरत असे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गाय चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असताना, नवी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट तीनने यासंदर्भात तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुशील बाळकृष्ण यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (हेही वाचा - Beed Gang Rape: विधवा महिलेवार सामूहिक बलात्कार, VIDEO बनवून पीडितेला ब्लॅकमेल; बीड जिल्ह्यातील घटना, सात जणांवर गुन्हा दाखल)

दरम्यान, आरोपीने चौकशीत गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी आरोपीला पनवेल तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. देशात अनेक ठिकाणी गुरे चोरण्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच अनेक घटनांमध्ये गायींची चोरी करून त्यांची कत्तलखान्यात विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे.

तथापी, हैद्राबादमधील बाळापूर येथील शरीफनगर येथे बुधवारी गुरे चोरून त्यांचे मांस विक्री करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने गायींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी चारचाकी पोलिसांना सापडली. तपासी पोलिस पथकाने त्यांना शरीफ नगर, बाळापूर येथे नेणाऱ्या वाहन चालकाचा माग काढला.