Nagpur: घरात प्रोजेक्ट तयार करताना ज्वलनशील पदार्थांचा भडका उडाल्याने 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

Nagpur: नागपूरमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. घरात प्रोजेक्ट तयार करताना ज्वलनशील पदार्थांचा भडका उडाल्याने 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. गौरव डाखोडे, असं या तरुणाचे नाव आहे. तो नागपुरातील एसएफएस महाविद्यालयातील बीसीएच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी होता. गौरव 16 ऑगस्ट रोजी घरात प्रोजेक्ट करत होता. यादरम्यान, ज्वलनशील पदार्थांचा भडका उडाल्याने त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान गौरवचा मृत्यू झाला. गौरवच्या मृत्यूमुळे संपूर्ण नागपूर शहरात हळहळ व्यक्त होतं आहे.

प्राप्त माहितीनुसार, गौरवने प्रोजेक्ट तयार करण्यासाठी घरी काही साहित्य आणले होते. गौरव दुपारी घरात प्रयोग करत होता. यादरम्यान, प्रयोगासाठी आणलेल्या साहित्याचा अचानक भडका उडाला. या भडक्याची आग गौरवच्या कपड्यांना लागली. या गौरव गंभीर जखमी झाला. (हेही वाचा - Mumbai Shocker: वसई मध्ये 17 वर्षीय मुलाची 3 मजली इमारतीच्या गच्चीतून उडी मारून आत्महत्या; तपास सुरू)

दरम्यान, गौरवला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गौरवचे वडील प्रमोद डाखोडे केंद्र तपासणीच्या संबंधित एका विभागात नोकरीवर आहेत. या घटनेनंतर गौरववर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान गौरवचा मृत्यू झाला.

पोलिसांनी याप्रकरणी गौरवच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गौरव नेमका कोणता प्रोजेक्ट तयार करत होता आणि त्यासाठी त्याने कोणते रसायने आणली होती? हा भडका नेमका कशामुळे उडाला याचा तपास पोलीस करत आहे.