Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज 969 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 94,863 वर  
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 969 रुग्णांची नोंद झाली असून, 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह मुंबईमधील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 94,863 झाली आहे. आजच्या मृत्युसह शहरात आतापर्यंत एकूण 5402 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईमध्ये 1011 कोरोना रुग्ण बरे झाले आहेव व आतापर्यंत 66,633 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज मुंबईमध्ये 932 संशयित कोरोना रुग्णांची भरती करण्यात आली आहे. सध्या मुंबईमध्ये 22,828 सक्रीय रुग्ण आहेत. बीएमसीने याबाबत माहिती दिली.

आज झालेले सर्व 70 मृत्यू हे गेल्या 48 तासांत झाले आहेत. यातील 56 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 49 रुग्ण पुरुष व 21 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 2 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 44 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 24 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 70 टक्के आहे. 7 जुलै ते 13 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.34 टक्के इतका आहे. शहरामध्ये 13 जुलै 2020 पर्यंत झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 4,01,741 इतक्या आहेत. यासह मुंबईमध्ये रुग्ण दुप्पटीचा दर 52 दिवस झाला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात कोरोनामुळे आजवर 10,695 मृत्यू; आज 6,741 नव्या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या 2,67,665 वर)

एएनआय ट्वीट -

पुढे बीएमसीने 13 जुलैपर्यंतची विविध कोरोना सुविधा केंद्रातील क्षमता नमूद केली आहे. त्यानुसार, DCH & DCHC- जास्त लक्षणे व गंभीर रुग्णांसाठी+ मध्यम लक्षणे व दिर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांसाठी बेड्सची संख्या 16,855 आहे. सक्रिय CCC2- लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी एकूण क्षमता 5964/23,945 बेड्स इतकी आहे. सध्या शहरामध्ये ऑक्सिजन बेड्सची संख्या 11,247 इतकी आहे.