BEST Bus| File Image | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashra) कोरोना विषाणूचे (Coronavirus) संकट आणखी गडद होताना दिसत आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस पावले उचलले जात आहेत. महाराष्ट्रात निम्म्याहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण एकट्या मुंबई (Mumbai) शहरातआढळून आले आहेत. सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. आता मुंबईसह इतर ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यातच बेस्टच्या आणखी 9 कर्मचाऱ्यांना (BEST Employees) कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, आतापर्यंत बेस्टच्या ताफ्यातील एकूण 137 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 31 मेपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रसह संपूर्ण देशात अत्यावश्यत सेवा वगळता सर्वकाही बंद आहे. या काळात रेल्वे, रिक्षा-टॅक्सी बंद असल्याने अत्यावश्यक सेवेतील वाहतुकीचा भार सध्या बेस्टवर आहे. बेस्टच्या दररोज दीड हजार बसगाडया रस्त्यावर धावत आहेत. त्यात 3 हजारपेक्षा जास्त चालक-वाहक कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त वाहतूक निरिक्षक आणि परिवहन विभागाबरोबरच विद्युत विभागातील कर्मचारीही कार्यरत आहेत. पण मास्क, सॅनिटायझरचा वापर, बेस्ट आगारात तपासणी होऊनही बेस्टमधील कर्मचाऱ्यांना करोनाचा विळखा बसत आहे. ज्या कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे किंवा जे कर्मचारी अन्य व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत. त्यांना घरातच विलग राहण्याच्या सूचना केल्या आहेत. हे देखील वाचा- चिंताजनक! महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 55 पोलिसांना COVID-19 ची लागण, एकूण संख्या 1328 वर

एएनआयचे ट्वीट-

 

दरम्यान, इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा नव्याने काहींचे विलगीकरण करावे लागले आहे. त्यात सध्या 55 पेक्षा जास्त वय असलेले कर्मचारी, अपंग कर्मचाऱ्यांसह उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार असलेल्या दीड हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना घरात राहण्याच्या सूचना आहेत.