Accident (फोटो सौजन्य - ANI)

Mumbai Hit-and-Run Case: मुंबई (Mumbai) च्या वरळीमध्ये आणखी एक हिट-अँड-रन प्रकरण (Hit-and-Run Case) समोर आले आहे. 85 वर्षीय व्यावसायिक बलराज परमानंद मेहरा यांना एका वेगवान मोटारसायकलने धडक दिली. हा अपघात (Accident) गुरुवारी झाला. अपघातानंतर मोटारसायकस्वार लगेचच घटनास्थळावरून पळून गेला. तक्रार मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी जवळपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली आहे. आरोपी हा मुंबई पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलचा मुलगा आहे.

पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल -

दरम्यान, दादर पोलिसांनी एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीने कबूल केले की, त्याच्या मोटारसायकलने ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली होती. पेडर रोडवरील आशा महाल येथील रहिवासी मेहरा हे रविवारी डॉ. अ‍ॅनी बेझंट रोडवरून चालत जात असताना एका अज्ञात दुचाकीने त्यांना धडक दिली. (हेही वाचा -Mumbai Accident: शहरात आणखी एक Hit And Run प्रकरण, कारची दुचाकीला धडक; खासदाराचा मुलगा गणेश हंडोरे याला अटक)

अपघातानंतर मेहरा यांना बीवायएल नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. व्यावसायिकाच्या मृत्यूनंतर, पोलिसांनी प्रभादेवी रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकी आणि वरळी कोळीवाडा येथील रहिवासी यश नंदकुमार गावकर यांच्या वाहनाची तपासणी सुरू केली.