मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना आता लवकरच सरकारकडून पगारवाढीचं गिफ्ट मिळणार आहे. दरम्यान सातव्या वेतन आयोग आता बीएमसी शाळेच्या विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहे. जय महाराष्ट्र शिक्षक आणि एम्लॉयिज या शिवसेना खासदार यांच्या नेतृत्त्वाखालील एका मंडळाला बीएमसीकडून खात्री देण्यात आली आहे. 7th Pay Commission: मोदी सरकार केंद्रीय कर्मचार्यांना 'किमान वेतन वाढ' प्रस्तावाला मंजुरी देत नववर्षाची भेट देणार?
दरम्यान पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी शुक्रवार (20 डिसेंबर) दिवशी भेटायला आलेल्या डेलिगेशनला दिलेल्या माहितीनुसार, सातव्या आयोगासोबतच शिक्षकांना दिवाळीचा 100% बोनसदेखील मिळणार आहे. तामध्ये शिक्षकांना सुमारे 15,000 रूपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाजगी शाळांसोबतच आता पालिका शाळांच्या शिक्षकांनादेखील पगारवाढ दिली जाणार आहे. यामध्ये 4500 शिक्षक आणि कर्मचार्यांना त्याचा फायदा होणार आहे.
शिक्षकांच्या इतर प्रलंबित मागण्यांवरही या वेळेस चर्चा करण्यात आली आहे. बीएमसीच्या प्रायमरी शाळांमधील शिक्षकांनाही सातवे वेतन आयोग लागू करण्याबाबत यावेळेस चर्चा झाली. सध्या हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर येत्या 2-3 महिन्यात बीएमसी कर्मचारी आणि शिक्षकांना नव्या पे स्केलनुसार पगार दिला जाणार आहे.
राज्य सरकारने मागील काही वर्षात पे कमिशनच्या अॅरियर्समध्ये 2300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे लवकरच ही रक्कम मंजूर करतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.