Imtiyaz Jaleel | ((Photo credit: archived, modified, representative image))

Marathwada Mukti Sangram Din 2019: औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांनी बनलेल्या मराठावाड्यासाठी आज ( 17 सप्टेंबर) चा दिवस खास आहे. आजचा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (Marathwada Mukti Sangram Din) म्हणून साजरा केला जातो. यंदाही या दिनाचं सेलिब्रेशन सुरू आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा 5 व्या वर्षीदेखील खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याने आता राजकीय वाद रंगायला सुरूवात झाली आहे. शिवसेनेच्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी ट्वीटरवरून जलील यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जलील यांनी काल शेअर केलेल्या एका फेसबूक पोस्टमध्ये 'मला देशभक्ती' सिद्ध करण्यासाठी तुमच्या सारख्या लोकांकडून प्रमाणपत्राची गरज नसल्याचं म्हटलं आहे. Marathwada Liberation Day: मराठवाडा मुक्ती संग्राम दिन का साजरा केला जातो? निजामाचे हैद्राबाद संस्थान आणि भारत सरकार यांच्यातील संघर्ष घ्या जाणून

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एक कार्यक्रम पार पडला. यामध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. . आमदार झाल्यापासून जलील मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत आहे. आता ते औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत मात्र तरीही ते आज कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने पुन्हा वाद रंगायला सुरूवात झाली.

मनिषा कायंदे पोस्ट

Manisha Kayande Post (Photo Credits: Twitter)

आज मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहून आजही स्वतःला निजामाचे वारस समजणाऱ्या औरंगाबादचे खासदार सईद इम्तियाज जलील यांचा जाहीर निषेध आपल्या खासदारीचा म्हणजेच निजामशाहीचा राजीनामा. अशा शब्दात इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे.

खासदार इम्तियाज जलील पोस्ट

रझाकार संघटनेने सर्वसामान्यांवर अत्याचार केले. त्यांच्यापासून मुक्तीचा दिवस म्हणून आजचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. यामध्ये इतिहासात रझाकारांच्या बाजूने एमआयएम हा पक्ष होता. आता त्यावरूनच टीका करत एमआयएम खासदार इम्तियाझ जलील अनुपस्थित राहिल्याने आता नवा वाद रंगायला सुरूवात झाली आहे.