मुंबई: बॉम्बे हॉस्पिटलच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारुन रुग्णाची आत्महत्या
Representational Image (Photo Credits: ANI)

मुंबईतील (Mumbai) मरिन लाईन्स (Marine Lines) येथील बॉम्बे हॉस्पिटलच्या (Bombay Hospital) 11 व्या मजल्यावरुन एका रुग्णाने उडी मारुन आत्महत्या करण्याचा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी (18 जुलै) रोजी हा सर्व प्रकार घडला. सतीश खन्ना (67) असे या रुग्णाचे नाव आहे. चेंबूर येथे राहणाऱ्या सतीश खन्ना यांना 15 जुलै रोजी उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काल त्यांना डिस्चार्ज मिळणार होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश खन्ना यांनी काल दुपारी 3 च्या सुमारास उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. उच्च रक्तदाबाच्या त्रस्त असलेले सतीश फॅमेली डॉक्टरकडे उपचार घेत होते. मात्र त्याचा काहीही परिणाम न झाल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. (प्रेमासाठी नकार दिल्याने तरुणाची कृष्णा नदीत उडी मारुन आत्महत्या)

सतीश यांचा मुलगा आणि बायको इंश्योरन्स आणि औषधोपचार यासंदर्भात डॉक्टरांशी बोलायला बाहेर गेले असता एकांताचा फायदा घेत त्यांनी हॉस्पिटलच्या रुममधून उडी मारली. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोस्टमार्टमसाठी त्यांचा मृतदेह जीटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. (वडाळा येथील 13 वर्षीय मुलाने उंच इमारतीच्या टेरेसवरुन उडी टाकत केली आत्महत्या)

आजाराला कंटाळून खन्ना यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.