Silver Bricks Found In Vikroli: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळीत मुंबईतील विक्रोळी (Vikroli) येथे एका कॅश व्हॅनमधून साडेसहा टन वजनाच्या चांदीच्या विटा (Silver Bricks) जप्त करण्यात आल्या आहेत. या विटांची किंमत करोडोंमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. विक्रोळी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या तपास पथकाने जप्त केलेल्या कॅश व्हॅनमध्ये या चांदीच्या विटा सापडल्या.
प्राप्त माहितीनुसार, कोट्यवधी रुपयांच्या या चांदीच्या विटा ब्रिंक्स कंपनीच्या वाहनात मुलुंड येथील गोदामात ठेवण्यात आल्या होत्या. या चांदीच्या विटा कोणाच्या आहेत, याचा तपास पोलिस करत आहेत. (हेही वाचा - Wada Police Seize Rs 3.70 Crore: पालघर जिल्ह्यात 3.70 कोटी रुपयांची रोकड जप्त; वाडा पोलिसांची कारवाई)
मुंबईत व्हॅनमध्ये सापडल्या 6500 किलो चांदीच्या विटा, पहा व्हिडिओ -
In Mumbai's Vikhroli area, over 6.5 tons of silver ingots were seized from a van, valued in crores. The Vikhroli police and the election commission's investigation team were involved in the seizure pic.twitter.com/Ib4DD6FXmy
— IANS (@ians_india) November 10, 2024
यापूर्वीही मुंबईत भुलेश्वरमध्ये 1 कोटी 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं होतं. याशिवाय पुण्यात देखील दोन ठिकाणी पोलिसांनी मोठी रोकड जप्त केली होती. पुण्यात रोकड नेण्यासाठी आरोपींकडून कारचा वापर करण्यात आला होता. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या काळात आयकराने विभागाने जप्त केली 1,100 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि दागिने; 2019 तुलनेत यंदा 182 टक्क्यांनी वाढ)
तत्पूर्वी पुण्याजवळच खेड शिवापूर टोल नाक्यावर जवळपास 5 कोटी रूपये जप्त करण्यात आले होते. यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. ही रक्कम शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप करण्यात आला होता. ठाकरे गट शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.