महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच लॉकडाउनच्या (Lockdown) काळात प्रत्येक नागरिकांनी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन आहेत. यामुळे अशा नागरिकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या काळात अवैध मद्य विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्रात 6 हजाह 332 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत 2 हजार 958 आरोपींना अटक तर, 17 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरातच बसून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहेत. राज्यात लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, राज्यात लॉकडाउन असताना अवैध पद्धतीने मद्य विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. राज्यातील 7 हजार 152 मद्यविक्रीच्या दुकानांना राज्य सरकारकडून परवानगी दिली आहे. दिवसभरात 51 हजार 728 ग्राहकांना घरपोच मद्यसेवा पुरवली आहे. तसेच अवैध मद्य विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी 6 हजार 332 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यात 2 हजार 958 आरोपींना अटक तर, 17 कोटी 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे. हे देखील वाचा- कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई, पुण्यात लष्कर बोलवणार? जाणून घ्या यामागील व्हायरल सत्य
ट्वीट-
राज्यात ७१५२ मद्यविक्री दुकाने सुरू. अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत ६३३२ गुन्ह्यांची नोंद, २९५८ आरोपींना अटक तर १७ कोटी १ लाखांचा मुद्देमाल जप्त- उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 26, 2020
महाराष्ट्रात केवळ ग्रीन झोनमध्ये असलेल्या दारूच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात मद्य विक्रीच्या दुकांनाना परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, दारुच्या दुकांनासमोर मद्यपींची मोठी गर्दी उसळली होती. त्यानंतर पुन्हा राज्यात दारु बंदी करण्यात आली. त्यानंतर राज्यात आता ऑनलाईन पद्धतीने दारुची विक्री केली जात आहे.