महाराष्ट्रात आता सणासुदीला सुरूवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतून पुणे, कोकण भागात चाकरमान्यांच्या फेर्या वाढणार आहे. मात्र या काळात 63 शिवशाही बस (Shivshai Bus) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अनेकांची गैरसोय होणार आहे. परिणामी प्रवासी पुन्हा खासगी बससेवेकडे वळणार असल्याची शक्यता वाढली आहे. एस टी ने खासगी शिवशाही पुरवठादारांच्या आर्थिक धोरणांमध्ये बदल केले त्यानुसार बस पुरवठादारांना कमी मोबादला दिला जातो. अॅरॉन आणि रेनबो या कंपनीने एकूण 63 शिवशाही एसटी ताफ्यातून काढून घेतल्या आहेत. यात 40 स्लीपर आणि 23 सीटींग असलेल्या शिवशाही बसचा समावेश असल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली आहे. ST च्या शिवशाही AC Sleeper बसच्या तिकीट दरात कपात; 13 फेब्रुवारीपासून लागू होणार नवे दर
एसटीने सात बसपुरवठादारांकडून भाडेतत्त्वावर शिवशाही सुरू केली. त्यापैकी दोघांनी बस काढण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिसर्याने महामंडळाला नोटीस दिली आहे. त्यानुसार 15-20 एसी बस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या काळात हा निर्णय अनेकांची कोंडी करणारा आहे. या काळात खाजगी बससेवा देणारे देखील चढ्या भावाने तिकीट विकतात
कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये शिवशाही बस बंद झाल्यानंतर हिरकणी आणि लाल परी बस धावणार आहे. मागील काही दिवसांपासून शिवशाही बस बेदारकपणे चालवत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळेही शिवशाहीवर टीका होत आहे.