पुण्यातील 6 वर्षांची मुलगी 17,500 फुटांपेक्षा जास्त उंचीवरील माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर (Mount Everest Base Camp) चढणारी सर्वात तरुण भारतीय मुलगी ठरली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातील रहिवासी असलेल्या आरिष्का लड्ढा हिने 15 दिवसांच्या मोहिमेवर असलेल्या तिची आई डिंपल लड्ढा यांच्यासोबत माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर चढाई केली. या आई आणि मुलींने 130 किमी अंतर 15 दिवसात कापले. त्यांनी - 3 पासून ते - 17 पर्यंत हा प्रवास केला. मुलीने 7-8 थरांचे कपडे घातले आणि संपूर्ण प्रवास हा केला. यावेळी 6 वर्षाची अर्शिका म्हणाली की "मला हा प्रवास फार आवडला मी या प्रवासात याक आणि खेचर पाहिले. आता मला माउंट एव्हरेस्ट सर करायचे आहे.''
यावेळी मुलीची आई डिंपल म्हणाली की "ती स्वतः लहानपणापासून खेळाडू आहे. ती इतकी वर्षे सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग करते. जेव्हा मी तिला माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर नेण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही एक उत्स्फूर्त योजना होती. आम्हाला तज्ञांनी सांगितले होते की सहसा 12 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले चढतात. मला आमच्या स्वतःच्या जबाबदारीवर मुलाला घेऊन जाण्यास सांगण्यात आले होते. आम्ही पुण्यात असताना शनिवार आणि रविवारी, आम्ही पुण्याच्या आजूबाजूचे किल्ले चढतो. आम्ही वारंवार सिंहगड चढलो आहोत,"
दरम्यान, अरिष्काचे वडील कौस्तुभ लड्ढा यांनी हा त्यांच्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले."तिने भारताचा गौरव वाढवला आहे. तिला आमचा सदैव पाठिंबा असेल. सुरुवातीला, आम्ही चिंतेत होतो कारण आव्हाने होती पण ती आणि तिची आई चढाईसाठी खंबीर होती," असे कौस्तुभ म्हणाला.