Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In Mumbai: मुंंबई महापालिकेच्या (BMC)  वतीने आज, रविवार 6 सप्टेंबर रोजीचा कोरोनाचा नियमित अहवाल देण्यात आला आहे. आजच्या अहवालानुसार कालपासुन मागील 24 तासात मुंंबई शहरात कोरोनाचे नवे (Coronavirus Cases) 1910 रुग्ण आढळुन आले आहेत, तर आजच्या दिवसात 911 जणांंना कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज (COVID 19 Recovery) देण्यात आला आहे, आज च्या दिवसात कोरोनामुळे नव्या 37 रुग्णांंच्या  मृत्युंंची(Coronavirus Fatality) सुद्धा नोंंद झाली आहे. दरम्यान यानुसार मुंंबईतील कोरोनाबाधितांंचा आकडा 1 लाख 55 हजार 622 इतका झाला आहे. तर आजवर रिकव्हर झालेल्या रुग्णांंची संंख्या 1 लाख 23 हजार 478 इतकी झाली आहे. मुंंबईत आजवर कोरोनामुळे 7866 रुग्णांंचा मृत्यु झाला आहे.  मुंंबईतील कोरोनाचा पुर्व हॉटस्पॉट म्हणजेच धारावी मध्ये आज कोरोनाचे 6 नवे रुग्ण आढळुन आले आहेत. 

प्राप्त माहितीनुसार मुंंबई मध्ये कोरोना रिकव्हरी रेट हा जवळपास 79 % इतका आहे तर कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा रेट आता 71 दिवसांंवर पोहचला आहे. मुंंबईत झपाट्याने कोरोना रुग्ण शोधण्याचे काम केले जात असुन त्यासाठी रॅपिड अ‍ॅंटीजन टेस्ट घेतल्या जात आहेत, आज वर कोरोनासाठी एकुण 8 लाख 24 हजार 886 चाचण्या झाल्या आहेत.

BMC ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात आज 23,350 कोरोना रुग्णांंची विक्रमी वाढ झाली आहे.सध्या राज्यातील कोरोनाबाधितांंचा आकडा 9,07,212 वर पोहचला आहे. राज्यात एकुण रिकव्हरी झालेल्यांंची संख्या 6,44,400 इतकी आहे तर मृतांंची संंख्या 26604 इतकी झाली आहे. राज्यात 2,35,857 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.