Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सातारा जिल्ह्यात (Satara District) कोरोना बाधित (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सातारा जिल्ह्यात आज 52 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात गेल्या 12 तासात 58 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 394 वर पोहोचली आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा जिल्हयात आतापर्यंत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच सध्या 255 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मंगळवारी साताऱ्यात रात्री नऊ वाजता 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यातील एका रुग्णाला ‘सारी’ आजारीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. (हेही वाचा - Coronavirus: अहमदनगर मध्ये मुंबईहून आलेल्या 3 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 75 वर पोहोचली)

दरम्यान, सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी माहिती दिली आहे. राज्यात मंगळवारी 2 हजार 91 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. तर दिवसभरात 97 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 54 हजार 758 वर पोहोचली आहे.