होळीच्या सणाला गालबोट; अर्नाळा समुद्रात 5 जणांचा बुडून मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI))

समुद्रावर होळी खेळायला गेलेल्या लोकांपैकी पाच जण समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे. वसई (प) येथील प्रसिध्द अशा अर्नाळा बीचवर ही घटना घडली आहे. हे सर्वजण वसईतील गोकुळ पार्क येथे राहणारे आहेत. घटना कळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणिइतर अधिकारी उपस्थित झाले असून अद्याप शोधकार्य सुरू आहे. यासाठी भारतीय तटरक्षक दलाची मदत घेण्यात आली आहे. दरम्यान कळंब समुद्रातही पाचजण बुडाल्याची घटना आज घडली आहे. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून, इतर अजूनही बेपत्ता आहे.

(हेही वाचा: होळीच्या रंगांचे डाग घरच्या घरी कपड्यावरून दूर करतील या '5' मॅजिकल टीप्स)

अर्नाळा समुद्रात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे –

1) निशा कमलेश मौर्या (36)

2) प्रशांत कमलेश मौर्य (17)

3) प्रिया कमलेश मौर्य (19)

4)कंचन मुकेश गुप्ता (35)

5) शितल दिनेश गुप्ता (32)