मुंबईतील धारावी (Dharavi) परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. धारावीत कोरोनाचे 15 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना बाधितांची संख्या आता 43 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 4 कोरोना बाधित रुग्णांचा बळी गेला आहे. धारावी परिसरात कोरोनाचा संसर्ग झालाय हे लक्षात येताच मुंबई महानगरपालिकेकडून ठोस पाऊल उचलण्यात आली. धारावी परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून त्या भागाचे निर्जंतुकीकरण देखील करण्यात आले आहे. तसंच कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हणून धारावी परिसर घोषित केल्याने त्या ठिकाणी जाण्या-येण्यासे नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी मुंबई पोलिस बॅरिकेड टाकून तैनात आहेत. विशेष म्हणजे भाजीपाला, फळ विक्रेते, फेरीवाले यांना देखील धारावी परिसरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नागरिकांना घरपोच केला जाणार आहे. (मुंबई: धारावीतील कंटेनमेंट, बफर झोन मध्ये भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फेरीवाल्यांना बंदी; कोरोना व्हायरसचा धोका आटोक्यात ठेवण्यासाठी BMC चे आदेश)
धारावीतील नागरिकांची स्क्रिनिंगद्वारे चाचणी करण्यासाठी 150 डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. तसंच धारावी परिसरात तैनात पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खास सॅनिटायझेशन टेंट देखील उभारण्यात आलं आहे. (धारावी येथील नागरिकांची स्क्रिनिंगद्वारे करण्यात येणाऱ्या चाचणीला 150 डॉक्टरांच्या पथकाकडून आजपासून सुरुवात)
ANI Tweet:
Maharashtra: 15 new #Coronavirus positive cases have been reported in Dharavi area of Mumbai. A total of 43 cases and 4 deaths have been reported here so far.
— ANI (@ANI) April 12, 2020
महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबईतील संख्या अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर घरोघरी जावून नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. तसंच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी देखील 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे.