Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) हा महाभयाण विषाणू मुंबईत (Mumbai) अगदी झपाट्याने पसरू लागला आहे. मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत कोरोनाचे आणखी नवे 47 रुग्ण आढळले असून रुग्णांचा आकडा 170 गेल्याची सांगण्यात येत आहे. ही गोष्ट खूपच चिंताजनक असून मुंबईतील परिस्थितीत दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचे चित्र समोर येत आहे. देशात कोरोना विषाणूच्या सक्रीय घटनांची संख्या 1024 आहे. यातील 96 लोक एकतर बरे झाले आहेत किंवा त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वाधिक 216 रुग्णांची नोंद झाली असून, यामध्ये 3 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. तरी बाहेरून आलेल्या कोरोना ग्रस्तांच्या बेजबाबदार वागणूकीमुळे कोरोना व्हायरस रोगाची लागण झपाट्याने होऊ लागली आहे. यामुळेच मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 170 वर जाऊन पोहोचला आहे. सावधान! कोरोनाबाधीत रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या 17 जणांना COVID-19 ची लागण

पाहा ट्विट:

 

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 6 लाख 81 हजार 706 वर पोहचली आहे. यांपैकी 31 हजार 882 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 45 हजार 696 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 24 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 96 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 215 वर पोहचली आहे. यात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.