Coronavirus In Maharashtra (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईनंतर पुण्यात (Pune) आढळून आले आहेत. पुण्यात आज 459 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 153 वर पोहचली आहे. यापैकी 280 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता नागरिकांच्या मनात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच धारावी परिसर अधिक मोठा असल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता जीवापाड प्रयत्न करत आहेत. हे देखील वाचा-BMC: मुंबई येथील धारावी परिसरात एकूण 1 हजार 583 कोरोनाबाधित; दिवसभरात 42 नव्या रुग्णांची नोंद

एएनआयचे ट्विट-

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. महाराष्ट्रात आज 2436 नवे रुग्ण आढळून आले असून 60 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 52,667 वर पोहचला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 1695 जणांनी आपला जीव गमावला आहे.