प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोना विषाणूची (Coronavirus) संख्या झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहे. मात्र, अद्यापही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल दिसून आला नाही. यातच नागपूरकरांची (Nagpur) चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नागपूर शहरात आणखी 44 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या 200 वर पोहचली आहे. यामुळे नागरिकांची संख्या 200 वर पोहचली होती. महत्वाचे म्हणजे, यापैकी 58 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे. तसेच शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागपूरच्या नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्यात आज 1 हजार 223 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोनाविषाणू संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 2 लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतात कोरोना विषाणूने शिकराव केल्यापासून आतापर्यंत 49 हजार 391 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 694 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 14 हजार 183 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हे देखील वाचा- BMC: मुंबई येथील धारावी परिसरात आज आणखी 68 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले; आतापर्यंत 733 लोकांना संसर्ग तर, 21 जणांचा मृत्यू

एएनआयचे ट्वीट-

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय योजना राबवल्या जात आहेत. एवढेच नव्हेतर WHO सोबतही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.