NCB कडून ड्रग्स तस्करी प्रकरणात अटक केलेल्या व्यक्तीचा नांदेड कारागृहात मृत्यू
Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NARCOTICS CONTROL BUREAU) कडून अटक करण्यात आलेल्या 41 वर्षीय व्यक्तीचा नांदेड (Nanded) मध्ये कारागृहात मृत्यू झाला आहे. त्याला ड्रग्स तस्करी प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. शुक्र्वार (10 डिसेंबर) दिवशी पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान मृत व्यक्तीचं नाव Jitendrasingh Pargansingh Bhullar आहे.

मुंबई मध्ये ड्र्ग्स तस्करी प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. नंतर 26 नोव्हेंबर 2021 पासून Jitendrasingh Pargansingh Bhullar याची रवानगी नांदेड मधील कारागृहामध्ये करण्यात आली होती.

Jitendrasingh Pargansingh Bhullar याला गुरूवार (9 डिसेंबर) दिवशी छातीत दुखू लागले. त्याने त्रास होत असल्याची माहिती दिल्यानंतर सरकारी रूग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आले. मात्र रात्री 10 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. दरम्यान Jitendrasingh Pargansingh Bhullar याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाची ऑटोप्सी व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. नक्की वाचा: Maharashtra: जळगाव येथे एनसीबीकडून 1127 किलोचा गांजा जप्त .

मागील वर्ष दीड वर्षात मुंबई मध्ये एनसीबी ने अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये ड्रग्सच्या कारखान्यांवर छापेमारी करत अनेक रॅकेट्स उधळण्यात आली आहेत.